विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी प्रशिक्षण शिबिर- गिरीराज सावंत

कात्रज-: कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र मिल्ट्री ट्रेनिंग सेंटर कात्रज पुणे यांच्या संयुक्त माध्यमातून मोफत उन्हाळी शिबीरा अंतर्गत दोन आठवड्याचे कमांडो प्रशिक्षण शिबिर कात्रज येथील मनपा शाळेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते, त्याचा आज सांगता समारंभ पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिराज सावंत होते प्रसंगी, सौ.राजश्री सावंत जेष्ठ नागरिक संघाचे फाले, राजाराम वीर, क्रिस्टल स्पोर्ट्स चे श्रीपाद जगताप, मिल्ट्री ट्रेनिंग सेंटरचे मनोज नायडू बजरंग निंबाळकर, सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली जाधव यासह अनेक मान्यवर मंडळी पालक विद्यार्थी तसेच कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगता समारंभ प्रसंगी सर्व सहभागीना कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे टी शर्ट चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गिरिराज सावंत यांनी सांगितले की कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे माध्यमातून समाजातील सर्वच घटकासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष स्वरूपात मदत केली जाते. कमांडो प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण करणाऱ्या व देशाचे भविष्य असलेल्या या पिढीला शारिरीक व मानसिक व बौद्धिक दृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न असून या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सहभागी मुलांचे आणि खास करून पालकांचे विशेष आभार मानले. तसेच यापुढे देखील मोफत उपक्रम राबविले जातील असे आश्वासन दिले.
यावेळी राजाराम वीर, नायडू सर तसेच पालक व सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे आभार मानले.

उपक्रम खूब छान होता विद्यार्थ्यांना याचा भविष्यात लाभच होईल अशा उपक्रमाला खरोखरच सलाम असेच छान उपक्रम दरवर्षी घेण्यात यावे