पाकिस्तानातील आतंकवादी अड्ड्यावर हल्ला करून जबरदस्त नुकसान केले याबद्दल आनंद व्यक्त करताना आंबेगावकर
कात्रज प्रतिनिधी
नुकतेच काश्मीर पहेलगाम येथे आतंकवादाच्या कडून बेचुट गोळीबार करत 28 पर्यटकांचे हत्या करण्यात आली/ प्राण घेतले व या घटनेमुळे देशभरात एकच हळहळ व्यक्त झाली. पाकिस्तान कडून होत असलेल्या या कारवाईचा निषेध करण्यात आला. अशा प्रकारच्या वारंवार आतंकवादी घटना आणि देशवासीयचे जाणारे प्राण आणि हजारो सैनिकांची शहादत यावर ठोस उपाययोजना करण्याच्या हेतूने देश एकवटला सर्व राजकीय पक्षांनी एकीचे दर्शन घडवत पंतप्रधान सन्माननीय एक नरेंद्रजी मोदी साहेब यांनी कोणताही निर्णय घ्याल याला आमचा पाठिंबा आहे असे ठणकावून सांगितले. यावर पंतप्रधान मोदी यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांच्या तसेच मंत्रिमंडळ, विरोधी व सर्व पक्ष नेते यांच्या सोबत विचार विमर्श केल्यानंतर व सुरक्षा यंत्रणांना तयारीला पुरेसा वेळ दिल्यानंतर सहा तारखेच्या रात्री पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या जहाल आतंकवादी प्रशिक्षण केंद्रावर रात्रीच्या दरम्यान नऊ ठिकाणी हमला करून आतंकवाद्यांची केंद्र नेस्तनाबूत करण्यात आले. व यामुळे आतंकवाद्यांचे कंबरटे मोडले. यामध्ये 100 पेक्षा जास्त आतंकवाद्याना यमसदनी धाडले. आतंकवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबार व आक्रमणाच्या विरुद्ध धडा शिकवण्याचा हेतूने म्हणून भारत देशवासीयांच्या वतीने केलेली मागणी लक्षात घेत आतंकवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यात आले. यामध्ये मिळालेल्या भारी यशाबद्दल सर्व देशवासीयांनी फटाके फोडून मिठाई वाटून तसेच मोठ मोठे फ्लेक्स लावून आनंद व्यक्त केला. देशभरात, महाराष्ट्रात, पुणे शहरात त्याचबरोबर आंबेगाव बुद्रुक दत्तनगर चौक या ठिकाणी देखील फटाके फोडून त्याचबरोबर देशभक्तीच्या घोषणा देत हा आनंद व्यक्त करण्यात आला याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे मध्य हवेलीचे अध्यक्ष संदीप भाऊ बेलदरे पाटील त्याचबरोबर आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरदजी झिने तसेच परिसरातील अनेक मान्यवर मंडळी व नागरिक याप्रसंगी उपस्थित होती यावेळी हातात तिरंगा झेंडा फडकवत घोषणांच्या बरोबरच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम चा जयघोष करण्यात आला.
संपादक बजरंग निंबाळकर
1 thought on “पाकिस्तानवर केलेला अटॅक आणि त्याला मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल आंबेगाव वासिया कडून आनंद व्यक्त.”
जय हिंद