
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मदिन व शिबिरातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात साजरा करण्यात आला….
कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री.तात्यासाहेब भिंताडे (अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ), कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.पै.श्री. शिवाजीराव बुचडे (सचिव, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ), प्रा.फुलचंदजी चाटे (संचालक चाटे शिक्षण समूह), श्री. राहुल उर्फ रायबा नलावडे (शिवव्याख्याते) वस्ताद पै. ज्ञानेश्वर (माऊली) मांगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते शक्तीदेवता बजरंगबली आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दहावीच्या परीक्षेतील सतरा यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, नारळ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला…
तात्यासाहेब भिंताडे व फुलचंदजी चाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर शिवव्याख्याते राहुल नलावडे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा व सुश्राव्य व्याख्यान पार पडला.
कार्यक्रम प्रसंगी मांगडेवाडी गावचे उद्योजक पै.संदीपशेठ मांगडे, ॲड.अमोलशेठ मांगडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.रामभाऊ (तात्या) मांगडे, सुभेदार तालमीचे वस्ताद पै. शंकरराव दळवी, वेल्हा तालुका भाजपा अध्यक्ष पै.राजाभाऊ रेणुसे, आर्मी रि. कुस्ती कोच पै.चंद्रशेखर (बापू) धुमाळ, कुस्ती कोच पै.भारत मस्के, महाराष्ट्र चॅम्पियन पै.अमोल शेडगे, महाराष्ट्र चॅम्पियन पै.तानाजी सागर, कुस्ती संघटक निशांत (आप्पा) शिळीमकर, योगेश नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
