
सातारा:- काल भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा प्रजासत्ताक दिन शहीद जवान चंद्रकांत बळीराम भोईटे स्मारक या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे गावातील ग्रामस्थ, महिला भगिनी, शालेय विद्यार्थी, शिक्षक सर्वांच्या उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात पार पडला.
शहीद जवान चंद्रकात भोईटे यांच्या पुतळ्याचे पूजन आणि ध्वजारोहण तडवळे गावचे माजी सैनिक व पत्रकार सन्माननीय श्री बजरंग निंबाळकर साहेब यांचे चिरंजीव डॉ. सौरभ बजरंग निंबाळकर यांनी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (गट -अ) या पदी सातारा जिल्हा रुग्णालय येथे महाराष्ट्र शासनाची क्लास 1 या पोस्टवर निवड झाली. यानिमित्ताने डॉ सौरभ यांचे हस्ते झेंडावंदन करून शहीद जवान चंद्रकात भोईटे यांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले.
तसेच प्रा.रविंद्र शशिकांत भोईटे यांनी देखील कौशल्य उद्योजकता व वाणिज्य विभाग आय टी आय लोणंद महाराष्ट्र शासनाच्या वर्ग 2 पदी निवड झाली.
याबद्दल डॉ.सौरभ आणि प्रा.रवींद्र भोईटे दोन्ही युवकांनी गावाचे व परिवाराचे नाव रोशन केले,
या दोघांमुळे वैद्यकीय व कौशल्य विकासासाठी गावाला खूप फायदा होणार असल्याने, सामाजिक जबाबदारी समजून शहीद परिवाराच्या व आधार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने त्यांचा व परिवाराचा फेटा बांधून, शाल श्रीफळ ट्रॉफी पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला.
तसेच गावाचे भूषण सेवा निवृत्त सैनिक रवींद्र बाळासाहेब भोईटे यांची महाराष्ट्र लोक सेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत BJ मेडिकल कॉलेज पुणे व (ससून रुग्णालय) येथे लिपिक पदी निवड झाली, तसेच तानाजी नामदेव कचरे यांची आर्मीमध्ये निवड होऊन प्रशिक्षणासाठी दाखल झाला याबद्दल त्यांचे वडील श्री नामदेव कचरे त्यांच्याही याप्रसंगी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला.
प्रसंगी शहीद परिवारातील वीर माता पुष्पा काकी भोईटे, वीरबंधु संतोष बळीराम भोईटे, गावचे सरपंच नानासाहेब बडेकर, उपसरपंच रायबा भोईटे, विकास सोसायटी चेअरमन भागवत देशमुख, आधार चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष भोईटे, उपाध्यक्ष गजानन भोईटे, अजित भोईटे, सेवा निवृत्त सैनिक, राजकीय, सामाजिक, उद्योग व्यवसाय तसेच विविध विभागातील सर्व मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी, जेष्ठ नागरिक, सर्व शाळा विद्यार्थी व त्यांचे शिक्षक उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार शहीद जवान वीरबंधु संतोष भोईटे यांनी आभार मानले. प्रास्ताविक निलेश भोईटे तर सूत्रसंचालन महेश भोईटे यांनी केले.
