
सहकार नगर/ पुणे-:[जयदीप निंबाळकर] श्री गजानन महाराज शेगाव सेवा प्रतिष्ठान पुणे, सहकारनगर यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा 148 वा प्रगट दिन सोहळा सालाबाद प्रमाणे आयोजन केलेले असून 1 फेब्रुवारी- 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भजन, पारायण, पालखी सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद आणि आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्रद्धा व भक्तिमय वातावरणात मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे.
यादरम्यान 01 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सात वाजता ते दुपारी दोन श्री चेतन पोंक्षे यांच्या मधुर वाणीतून श्री गजानन विजय ग्रंथ पारायण होईल.
01 फेब्रुवारी – 07 फेब्रुवारी साय.
01 फेब्रुवारी मराठी भावभक्ती गीतांची मैफिल “तरंग मनातले” गायक कलाकार राजश्री ताम्हणकर, रसिका जोशी आणि ललित देशपांडे, निवेदन विना केळकर
सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी “श्वासात राजं ध्यासात राजं” सादरकर्ते अजय पुरकर, अवधूत गांधी, दिग्पाल लांजेकर, आणि मृणाल कुलकर्णी,
मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 कलांगण प्रस्तुत “माय लेकरं” संकल्पना आणि निवड डॉक्टर अरुणा ढेरे, सादरकर्ते डॉ. गिरीश ओक, मृणाल कुलकर्णी. चैत्राली अभ्यंकर
बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी कलाद्वयी प्रस्तुत नाट्यसंगीत व भक्ती गीतांची मैफिल “नाट्य भक्ती रंग” गायक कलाकार-अस्मिता चिंचाळकर, चिन्मय जोगळेकर, सावनी दातार- कुलकर्णी, साथ संगत- संजय गोगटे, प्रमोद जांभेकर, विद्यानंद देशपांडे, प्रसाद भांडवलकर, निवेदन- संजय गोसावी गुरुवार दि. 5 फेब्रुवारी सौ आरतीताई अंकलीकर-टिकेकर यांची शास्त्रीय व भक्ती संगीत मैफिल.
शुक्रवारी दि. 6 फेब्रुवारी ,”शाहिरी लोकरंग” सादरकर्ते- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकशाहीर, शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी व सह कलाकार.
शनिवार दि. 7 फेब्रुवारी “ज्याचा त्याचा विठ्ठल” सादरकर्ते- अंजली मराठे, पार्थ उमराणी, शौनक कुलकर्णी, स्वप्नील भावे, केतन पवार, ओंकार जोशी, गजानन परांजपे, अमित वझे आणि मधुराणी गोखले.
यादरम्यान शनिवार दि. 07 फेब्रुवारी सकाळी 07.30- 10.00 “आरोग्य व अध्यात्म यांचा संगम 21,121 सूर्यनमस्कार संकल्प” स्थळ- मंदिरांचे आनंदलहरी प्रांगण, आयोजक- श्री गजानन महाराज योगासन प्राणायाम वर्ग
रविवार दि. 8 फेब्रुवारी रोजी
श्री गजानन महाराज प्रगट दिन सोहळा, सकाळी 06.30 वा. सामुदायिक गजानन अष्टक व श्री गजानन बावन्नी पठण सकाळी 07.00 वा. महाभिषेक
सकाळी 08.00- 10.00 श्री चा पालखी सोहळा
दुपारी 12.00 वा. आरती
सायं. 07.00 वा. महाआरती
सोमवार दि. 9 फेब्रुवारी दु. 11.30 वा. महाप्रसादाचे आयोजन.
श्रद्धा आणि भक्तमय वातावरणात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाचा भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने केली आहे.
