स्वरदीप संगीत कला अकादमीचा वर्धापन दिन उत्साहात

धनकवडी, पुणे -: पुणे जिल्ह्यातील प्रख्यात पखवाज वादक दिपकजी दसवडकर यांच्या स्वरदीप संगीत कला अकादमी आयोजित वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव धनकवडी येथील लोकनेते ना. शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन, पखवाज पूजन व अकादमीतील विद्यार्थ्यांचे पखवाज वादन सादरीकरण झाले. त्याचबरोबर अकादमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा काश्मीर येथील डॉ. वीथिका तिक्कू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी कलाकार काश्मीर येथील पद्मश्री पं.भजन सोपोरी यांच्या शिष्या डॉ. वीथिका तिक्कू यांचे बहारदार असे संतूर वादन झाले. कार्यक्रमाचा शेवट पं.जयतीर्थ मेवुंडी यांचे शिष्य संगीत अलंकार रामेश्वरजी डांगे यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. या प्रमुख दोन्हीही कार्यक्रमांना तबल्याची साथ प्रख्यात तबलावादक श्री. किशोरजी कोरडे व पखवाज साथ या अकादमीचे संस्थापक व गुरु श्री. दिपकजी दसवडकर यांनी केली. हार्मोनियम साथ श्री. अमोलजी मोरे यांनी केली.
प्रसंगी पुण्यनगरीचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, मा.नगरसेवक विशाल तांबे, सौ.वर्षाताई तापकीर, पै. बाळाभाऊ धनकवडे, युवराज बेलदरे उद्योजक तानाजीबापू मांगडे, एकनाथ वालगुडे, आदर्श सरपंच सुरेश कोडीतकर, संतोष रेणुसे, मावळा जवान संघटना पुणे जिल्हाध्यक्ष पप्पू शेठ गुजर, राजगड वेल्हेचे उपसरपंच निलेश पवार, उद्योजक मंगेश शिळीमकर, देवाभाऊ इंगुळकर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्तनकार ह.भ.प.सुनिल महाराज शिंदे (शास्त्री) यांनी केले.
