उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

आंबेगाव बुद्रुक पुणे -: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या आवाहनाला तत्परतेने प्रतिसाद देत महानगरपालिकेच्या सहकार्याने चिंतामणी ज्ञानपीठ व ऐश्वर्या कट्टा यांच्या वतीने आंबेगाव परिसरातील चिंतामणी चौक आंबेगाव ते निलगिरी चौक हा रस्ता दत्तक घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या उपायुक्त माधव जगताप, डाॅ. विजय थोरात व सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे नुकतेच आवाहन केले की, प्रशासन एकट्याने विकास करू शकत नाही त्यासाठी जनतेचाही सहभाग व मदत असणे गरजेचे आहे. वेगाने विकसित होत असलेल्या या महानगरपालिकांमध्ये विकास करताना सर्वांनीच सहभागी व्हावे असे आवाहन केले. या आवाहनाला तत्परतेने प्रतिसाद देत चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष आप्पा रेणुसे यांनी हा रस्ता दत्तक घेण्याचे जाहीर केले. गेली सहा वर्षे तोरणागडाचे दायित्व चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचेच पुढचे पाऊल हा रस्ता दत्तक घेऊन टाकण्यात आले आहे. भविष्यात अजून पाच रस्ते दत्त घेण्याचे योजले आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपयुक्त माधव जगताप यांनी हा पुणे शहरातला दुसरा उपक्रम आहे व दक्षिण पुण्यातला हा पहिला उपक्रम आहे आणि हा आपला पायलट प्रोजेक्ट होणार आहे प्रशासन व जनता यांच्या संयुक्त विद्यमाने या भागाचा विकास निश्चितपणे करण्यास महानगरपालिकेचे सहकार्य आहेत असे नमूद केले त्याचप्रमाणे उपायुक्त डॉ विजय थोरात यांनी या उपक्रमास महानगरपालिकेचे सर्वतोपरी सहकार्य असेल व या वेगाने विकसित होणाऱ्या भागात नागरिकांना चांगल्या सुविधा या निमित्ताने देण्याचा आमचा प्रयत्न राहील चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने हा अतिशय स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे आणि हा उपक्रम पूर्ण होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे नमूद केले त्यानंतर सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे म्हणाल्या, हा अतिशय विधायक पुढाकार आहे. यामुळे योग्य ते सहकार्य करण्याची संधी आपल्याला सर्वांनाच या निमित्ताने प्राप्त होणार आहे. सर्वांनी यात आवर्जून सहभागी व्हावे, या माध्यमातून इतरांनाही असा पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळेल,
दक्षिण पुण्यामध्ये हा वेगळ्या प्रकारचा उपक्रम जनतेच्या सेवेसाठी हाती घेण्यात आला आहे. यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. याप्रसंगी महानगरपालिकेच्या विविध खात्यांचे अधिकारी, विलासराव भणगे, सर्जेराव शिळीमकर, शंकर कडू , सचिन डिंबळे , युवराज रेणुसे, मधुकर कोंढरे, दिलीप जगताप , सोमनाथ शेडगे, मंगेश साळुंखे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
