
कात्रज;- कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये कात्रज कोंढवा रस्त्यावरील नागरिकांच्या तक्रारी व होणाऱ्या त्रासामुळे तसेच वाहतूक कोंडीमुळे मा.महापालिका आयुक्त व वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार अंतर्गत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कात्रज कोंढवा ते खडीमशीन चौक येथील रस्ता पदपथ तसेच फ्रंट व साईट मार्जिन मधील अतिक्रमणावर बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण विभाग संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई श्री.संदीप खलाटे (उप आयुक्त अतिक्रमण) श्री जयंत भोसेकर (उप आयुक्त परिमंडळ क्र.चार) व श्री लक्ष्मण कादबाने (सहाय्यक आयुक्त कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय) यांचे नियंत्रणाखाली करण्यात आली.
सदर कारवाईस उप अभियंता , शाखा अभियंता, श्री ढगे, श्री उदय पाटील, श्री विजय पाटील (कनिष्ठ अभियंता) श्री तारु (क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक) श्रीमती राऊत(अतिक्रमण निरीक्षक) श्री. नवाळी, गांगुर्डे, खैरनार श्री पवार व श्री माने (सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक), श्री कांबळे , पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी व १० महाराष्ट्र सुरक्षा बल इत्यादी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सदर कारवाई मध्ये एकूण ७५०० चौ. फूट व सोळा कच्चे/पक्के शेड काढण्यात आले, तसेच सात ट्रक अतिक्रमण कारवाई मधील साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
