
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी, यासाठी नुकतेच राजाराम पुल ते फनटाईम सिनेमा यादरम्यानच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे स्थानिक वाहतूक समस्येवर प्रभावी तोडगा निघाला असला तरीही फनटाईम सिनेमा परिसरात नागरिकांना अद्यापही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याच्या राज्यमंत्री तथा आमदार मा. माधुरीताई मिसाळ तसेच आमदार भीमराव आण्णा तापकीर यांच्यासह सबंधित अधिकारी यांनी फनटाईम सिनेमा परिसराची पाहणी केली.
यावेळी अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील यांच्यासह महानगरपालिकेच्या आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी वाहतूक कोंडी सोडवण्यासंदर्भात चर्चा करत वाहतूक नियोजन अधिक प्रभावी करण्याचे तसेच परिसरातील अतिक्रमण हटवून वाहतूक सुलभ करण्याचे निर्देश दिले.
तसेच यापुढे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी योग्य ती धोरणात्मक पावले उचलण्याच्या सूचनाही वाहतूक विभागाला देण्यात आल्या.
यावेळी मा. नगरसेवक श्री. श्रीकांत जगताप, श्री. प्रसन्न जगताप, श्री. हरिदास चरवड, सौ. मंजुषा नागपुरे, श्रीमती ज्योती गोसावी, सौ. श्रावणी जगताप, श्री. बाळासाहेब आखाडे, श्री. सचिन मोरे, श्री. राजू कदम, श्री. प्रशांत थोपटे, श्री. निखिल शिळीमकर, श्री. मनोज नाशिककर, श्री. प्रतिक देसर्डा, तसेच मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री. युवराज देशमुख, मुख्य अभियंता (पथ) श्री. अनिरुद्ध पावस्कर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप दीगाडे, अधीक्षक अभियंता श्री. साहेबराव दांडगे, श्री. संदीप रणवरे, उप अभियंता (पथ) नरेश रायकर, कनिष्ठ अभियंता (पथ) नेहा कोलते, उप अभियंता (प्रकल्प) पवन मापारी, कनिष्ठ अभियंता (प्रकल्प) संभाजी कवठे, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका प्रभारी सहाय्यक आयुक्त श्री. तिमय्या जंगले, उप अभियंता श्री. विजयकुमार वाघमोडे तसेच स्थानिक नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
