कात्रज (पुणे)
पुणे शहराचे दक्षिण प्रवेशद्वार म्हणून कात्रजला ऐतिहासिक ओळख आहे, मात्र या ठिकाणी अरुंद रस्ते त्याचबरोबर वाहनांची वाढती संख्या, अतिक्रमण व निर्मांनाधिन पुल यामुळे येथे कायमच वाहतूक कोंडी होत असल्याने ऐतिहासिक प्रसिद्ध अशा ठिकाणाला डाग लागत आहे.,
याचा त्रास वाहन चालकांना, नागरिकांना त्याचबरोबर वाहतूक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो.
यामुळे वाहन चालकांचा जाणारा वेळ, त्याचबरोबर इंधनाची खपत व होणारे प्रदूषण ही बाब प्राकर्षणात जाणवणारी आहे, याचा मानसिक व आर्थिक फटका वाहन चालकांना होत असतो.
अनेक वर्षांच्या कायदेशीर कचाट्यातून सुटून तसेच चर्चा बैठक यामधून नुकताच कात्रज चौकातील प्लॉट रस्त्यासाठी ताब्यात मिळाला या 50 मीटरच्या आसपास तयार होणाऱ्या रस्त्यामुळे बरीच मोठी वाहतूक कोंडी टाळणार असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
अनेक दिवस पूर्वी हा प्लॉट महानगरपालिकेला ताब्यात मिळून देखील जेवढ्या तातडीने हे काम होणे गरजेचे होते तेवढ्या तातडीने होताना दिसत नाही. अंदाजे 50 मीटरचे काम अद्याप पर्यंत रखडल्यासारखे वाटते, सद्या या ठिकाणी सिमेंटचा रस्ता तयार झालेला आहे. याचे काम झाले असेल तर तो तात्काळ वाहन चालकांसाठी खुला करावा. यामुळे त्रस्त वाहन चालक आणि पोलीस यांची सुटका होऊन वाहतूक कोंडी सुद्धा आवाक्यात येऊ शकते.
याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे तसेच वाहतूक विभागाने देखील याचा पाठपुरावा करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे.
तयार होणारा रस्ता आणि निर्माणाधिन उड्डाण पूल पूर्ण क्षमतेने तयार होईल त्यावेळी या चौकाचे चित्र वेगळे असेल.
