
Rohit Sharma Retirement : रोहित शर्माने बुधवारी आपली कसोटी कारकीर्द संपवून क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले. रोहितने आता टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण तो एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील. कसोटी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लगेचच त्याने त्याच्या टीकाकारांवर निशाणा साधला आहे. ‘हिटमॅन’ ने अशा कॉमेंटेटर्सना लक्ष्य केले आहे जे क्रिकेटचे विश्लेषण करण्यापेक्षा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
रोहित शर्माने त्याच्या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 19,700 धावा केल्या आहेत. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत, तरीही तो टीकेपासून वाचू शकलेला नाही. आता एका प्रसिद्ध क्रीडा पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतात कॉमेंटेटर्स स्तर खालावत चालला
