
IPL 2025 : भारतात आयपीएल 2025 ची धामधूम सुरू आहे. धर्मशाळा येथे रद्द झालेला दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना हंगामातील 58 वा सामना होता. या हंगामात एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजे अजून 16 सामने शिल्लक आहेत. आगामी सामन्यांवर संकटाचे ढग दाटून येत आहेत. याचे कारण भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव आहे. पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
