राज्यस्तरीय “गुरु आनंद पुरस्कार २०२५” वितरण सोहळा दिमाखात संपन्न

कात्रज : राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य श्री.आनंदऋषीजी महाराज सा. यांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘गुरु आनंद पुरस्कार २०२५’ सोहळा वात्सल्यमूर्ती परमपूज्य श्री. इंदूप्रभाजी महाराज. सा. यांच्या पावन सानिध्यात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य आनंदऋषी महाराज.सा यांच्या १२५ व्या जयंती निमित्त विविध उपक्रमांच्या आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाप्रसादी, भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वाटप तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यस्तरीय ‘गुरु आनंद पुरस्कार 2025 ‘ कर्तव्यरत्न पुरस्कार आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस शरद झिने, सावित्रीची लेक पुरस्कार सहाय्यक आयुक्त पुणे मनपा सुरेखा भणगे, आदर्श पत्रकार पुरस्कार जैन संदेश चे संपादकसुभाषजी लुंकड आणि दैनिक सकाळचे पत्रकार किशोर गरड यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
जयंतीनिमित्त आयोजित ‘आनंद ‘ प्रवचनाप्रसंगी बोलताना वात्सल्यमूर्ती परमपूज्य श्री. इंदूप्रभाजी महाराज. सा. म्हणाल्या अनुमोदन करा आलोचना करू नका, वंदनीय बना निंदनीय बनवू नका, श्रद्धाळू बना अंधश्रद्धाळू बनू नका,
आनंदऋषींचे जीवन सागर होते. या सागरातील एक मोती जरी आपण आपल्या जीवनात घेतला तरी आयुष्याचे सार्थक होईल.
प्रमुख पाहुणे चकोरजी गांधी म्हणाले बाळासाहेब धोका जैन समाजातील परिवर्तनवादी नेतृत्व आहे समाजाच्या हितासाठी त्यांनी शांत बसू नये , पुरस्काराच्या निमित्ताने पोलीस,पालिका प्रशासन ,पत्रकार आदी समाजातील सर्व घटनांना सोबत घेऊन काम करत आहेत. ही बाब जैन समाजासाठी गौरवास्पद आहे.
आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच भारतातील पहिले ‘ऊर्जा चरण’ व आनंद दरबार मध्ये सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमास चकोरजी गांधी, नगरसेवक युवराज बेलदरे, संतोष ताठे, दीपक बेलदरे, अंकुश जाधव, संदीप बेलदरे, सुधीर कोंढरे , तुषार बंब देवीदास जाधव नितीन जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाप्रसादी लाभ नगरसेवक युवराज बेलदरे,लीलाबाई बन्सीलाल ओस्तवाल यांच्या परिवारास मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ धोका यांनी केले तर आभार चातुर्मास समितीचे अध्यक्ष उमेदमल धोका यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद दरबार जुगराज चत्तर दिलीप संचेती सुभास लूणावत पंकज बाफना च्या सर्व कार्यकारणी मंडळ यांनी परिश्रम घेतले.
