दत्तनगर आंबेगाव येथे अंगणवाडी सेविका व स्वच्छता दूतांचा सन्मान

कात्रज: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीमध्ये हवेली मंडलच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये भव्य रक्तदान शिबिर तसेच दत्तनगर ,आंबेगाव, जांभुळवाडी, कोळेवाडी, परिसरातील सफाई कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .उपस्थित सर्व सेवकांना स्टील पाणी बॉटल भेटो देण्यात आली.
या कार्यक्रमास भाजपच्या वरिष्ठ नेत्या संगीताताई राजे निंबाळकर , पुणे मनपाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुरेखा भणगे, महारष्ट्र कामगार आघाडीचे सचिव श्री नितीनजी जांभळे, भाजपा मध्य हवेली सरचिटणीस श्री.मंगेश जाधव, राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच श्री.अमर चिंधे, भारतीय जनता पार्टी मध्य हवेली उपाध्यक्ष श्री.अनंत माने , वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती बढीये, आरोग्य निरीक्षक प्रमोद ढसाळ, भाजप महिला आघाडीच्या सौ. अश्विनी चिंधे , शुभांगी जांभळे, रूपाली माने, अनिता देवकर, गीता आईवळे , आरोग्य निरीक्षक प्रियंका कंक , नवनाथ बांदल, राजेश दळवी,अनंत तरकसबंध आदी मान्यवरांसह परिसरातील अंगणवाडी सेविका व स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – संतोष अनेराव यांनी केले.
