
दुखद वातावरणात लोकनेते स्व.अजित दादांना श्रद्धांजली
अनेकांच्या भावना अनावर, आठवणींना उजाळा.
धनकवडी पुणे (जयदीप निंबाळकर)-: लोकनेते स्व.अजित दादा यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. आणि राज्यावर पवार कुटुंबीयांवर, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावर दुःखाचा डोंगर उभा राहिला. याच निमित्ताने आज धनकवडी येथील शरदचंद्रजी पवार बहुद्देशीय भवन सभागृहात धनकवडी करांचे वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते, प्रसंगी अनेकांचे कंठ दाटले.
यावेळी अनेकांनी आपल्या मनातील दुःख व भावना व्यक्त केल्या, अनेकांना आश्रु आवरता आले नाही. आपल्या भावना व्यक्त करताना आपले मन मोकळे केले.
डॉ.संजय जगताप- तडफदार नेतृत्व हरवले. तळागाळात पोहोचणारा नेता. असा नेता होणे नाही.
पं.समितीचे मा.सदस्य सुनील खेडेकर- महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व गेले,कार्यकर्ते व पदाधिकारी यांना बळ दिले.
माजी प्राचार्य /पत्रकार बाजीराव गायकवाड- पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना भेटलो. पुरस्कार मिळाला तर अभिनंदन केले. सर्व सामन्याच्या खाद्यावर हात ठेवत प्रेरणा देणारे दादा.
संजय यादव (शिक्षक) – शेती सहकारासह अनेक क्षेत्रात चांगले निर्णय घेऊन अफाट प्रगती केली. सर्वांनी दादांचे विचार अंगिकारावेत.
बालाजी पवार (रासप) – अन्य विकास कामाबरोबरच क्रीडा क्षेत्रासाठी मोठे योगदान अनेक पैलवानाना दत्तक घेतले.
मा.नगरसेवक युवराज बेलदरे- शिस्त आणि वक्तशीरपणा जपणारे दादा. शेवटच्या क्षणापर्यंत काम करणारा व सर्व महाराष्ट्र हळहळला असा लोकप्रिय नेता.
दादा देवकर- सर्व जाती धर्म पंथ गोरगरीब सर्वांना न्याय देण्याचे काम केले. विकासपुरुष एकनिष्ठ आणि संकट मोचक असे दादा.
नगरसेविका वर्षाताई तापकीर- सतत अंगावर खादी व हातात कामाची यादी व मनामनात अधिष्ठान निर्माण करणारे दादा. त्यांच्या विकासाचा ध्यास पुढे जाऊयात.
प्रभात मित्र मंडळ अध्यक्ष दीपक माने-
विकासाचा ध्यास असणारा दादांची उणीव आपल्या सर्वांना भासणार.
मा. नगरसेविका अश्विनी भागवत –
शोकसभेला उपस्थित रहावे लागेल असे वाटले नाही. आमचे प्रेरणास्थान असणाऱ्या दादांच्यामध्ये नेमकेपणा होता.
प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड संभाजी शिंदे – राज्याला सच्चा शिवप्रेमी व इतिहासाची जाण असणारा नेता हरपला. शाहू फुले आंबेडकर विचार जपणारे, विश्वास बसत नाही इतकी दुःखद घटना.
नगरसेवक अरुणभाऊ राजवाडे –
अभ्यासू व सर्वकष लक्ष असणारा, काम करण्यात तत्पर असणारा नेता. विकास कामामध्ये कितीतरी पटीने योगदान, प्रचंड मोठी हानी.
नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे-
दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला.
चांगली सर्व विशेषणे दादांना लागू होतात. विशेष देवी देणगी लाभलेले दादा.
स्थायी समिती मा. अध्यक्ष विशाल तांबे-
जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला.
उभ्या आयुष्यभर नावाला साजेसे काम,
35 वर्ष सहवास लाभला, विकासाचा ध्यासपुरुष. धनकवडीकरांना अनेक विकासकामे व हि भव्य वास्तू लाभली. दादांची उणिव भासणार, बहुगुणी व कुटुंबप्रमुख असा नेता.
मा.महापौर दत्ताभाऊ धनकवडे
दक्षिण पुण्यावर विशेष प्रेम असणारे दादा. पुण्याला मेट्रो, मेट्रोचे स्टेशन दिले. नागरिकांना सोईच्या झाल्या पाहिजे असा सतत अट्टाहास, समाविष्ट गावाचा विकास आराखडा प्राधान्याने मंजूर करण्यात मोठा वाटा. कार्यकर्त्यांची सुख दुखे जाणणारा व पाठीशी ठाम उभा राहणारा नेता.
आमदार भीमराव तापकीर- दादांच्या कामाची सुरवात पहाटेची असायची. मोठी दुखद घटना. देशभरातील लोकात पोहचलेले नेता. वेळेला व कामाला महत्व देणारा. सहकार व सर्व क्षेत्राला बळ देणारा नेता. चौकस बुद्धी व इत्यंभूत ज्ञान असणारे नेते. काम अभ्यासूर्ण असल्यामुळे कधीही माघार घ्यावी लागली नाही.मिश्किल स्वभाव हरजबाबी नेता.बजेटचा सर्व अभ्यास असणारे, सभागृहात त्यांची उणीव जाणवणार.. असा लोकनेता. कित्तेक दशकानंतर घडलेला अनुभवी नेता. अशी वेळ येणे दादांनी जाणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असे सांगितले.
प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप विजय धुमाळ, संजय धनकवडे, अनिल भोसले, यासह अनेक धनकवडीकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी दादांच्या विचाराचा आदर्श घेत मार्गक्रमण करण्याची शपथ घेत श्रद्धांजली अर्पण केली.
अनिरुद्ध येवले व मित्रांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
