
पुणे : पिंपरी – चिंचवड, पुणे येथे शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने “५वी नोटरी परिषद २०२५” आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ‘रामकृष्ण मोरे सभागृह’ पिंपरी चिंचवड पुणे येथे सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन सिंग मेघवाल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय प्रसन्न वराळे साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौ.रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती संदीप.व्ही. मारणे, न्यायमूर्ती आरिफ एस.डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस.के.महाजन, महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती अण्णासाहेब बनसोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेमध्ये वरिष्ठ नोटरी व कायदेविषयक योगदान देणाऱ्या ज्येष्ठ वकिलांचे सत्कार करण्यात येणार आहेत तसेच या ऐतिहासिक परिषदेच्या माध्यमातून नोटरी पदाचा दर्जा,व्यावसायिक सक्षमता व तांत्रिक सुधारणांवर. भर दिला जाणार आहे. नोटरी कायदा व संबंधित न्यायनेवाडे यावर चर्चा होणार आहे.
या परिषदेला राज्यभरातून मोठ्या संख्येने नोटरी वकील बंधू भगिनी सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष ॲड. यशवंत खराडे, सेक्रेटरी ॲड.प्रविण नलवडे, निरीक्षक ॲड.आतिश लांडगे. महिला अध्यक्ष ॲड.शोभा कड ॲड.महिला सचिव ॲड .ज्योती पांडे ॲड.नरेंद्र कणसे उपस्थित होते.

