
कात्रज -:
कात्रज विकास आघाडीचे सर्वेसर्वा नमेशजी बाबर हे कात्रजचा खऱ्या अर्थाने विकास साधण्याच्या हेतूने हातात धनुष्यबाण घेनार असून ठाणे येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या 16 मे शुक्रवारी खांद्यावर भगवा आणि हातात धनुष्यबाण घेनार आहेत.
नमेश बाबर यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे दक्षिण पुण्याच राजकीय चित्र व वातावरण बदलणार असून मागील काही दिवसापासून कात्रज व दक्षिण पुण्यात राजकीय क्षेत्रात अनेक उलथापालथ व बदल होताना दिसत असतानाच नमेश बाबर व सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश करून एक प्रकारे धमाका होणार असल्याचेही जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.
