
मोहरी, ता भोर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठान, श्री अमृत्तेश्वर तरुण मंडळ मोहरी व ग्रामस्थ यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी पुरंदर येथून आणलेल्या
शंभूज्योत व संभाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. तसेच छत्रपती शंभूराजे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मावळ्यांनी हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हिंद जय भारत यां जयघोषाने पूर्ण गाव दुमदुमून गेले.
पहलगम येथे पर्यटकांची हत्या व भारत पाकिस्तान युद्धात वीरगती झालेले जवान व प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वर्गीय अविनाश लेकावळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यां वेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते उमेश अहिरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे बहुविध भाषांचे ज्ञान तसेच त्यांनी लिहलेले ग्रंथ यामुळे संभाजी राजांना “ज्ञान पंडित” म्हणून संबोधले जायचे तसेच आदर्श आज्ञाधारक राजपुत्र म्हणून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवले. त्याच विचार धारेवर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षण करण्याबरोबरच राज्याचा पसारा वाढवला. त्याचप्रमाणे आपल्या मुलांवर संस्कार करावेत तसेच मुलांनी देखील छत्रपती संभाजी महाराजं प्रमाणे आपल्याला आई वडिलांचे चे स्वप्न पूर्ण केलं पाहिजे छत्रपतींच्या विचारांचे वारसदार झाले पाहिजे, संभाजी महाराजां प्रमाणे निर्मळ व आदर्श विचार आपल्याला अंगीकारायला हवेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसिंग लेकावळे व अनिकेत लेकावळे यांनी केल..!
कार्यक्रमचे संयोजन राजेंद्र लेकावळे, ऋषिकेश लेकावळे, तुषार लेकावळे, शिवम बिऱ्हामणे, सोन्या किंगरे, शुभम लेकावळे, सिद्धेश लेकावळे, अनिकेत लेकावळे, दत्ता लेकावळे, शंकर खोपडे, रोहित लेकावळे, विशाल लेकावळे, साहिल शेडगे, ऋषी झांजले, समीर पांगारे, श्रवण लेकावळे, सोहम लेकावळे, करण लेकावळे, ओंकार खोपडे, संग्राम सोंडकर यांनी केले
