
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी नागपूर: मागील दोन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावाची परिस्थिती आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत. जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात संघर्ष निर्माण झाला आहे. सीमेवर एकीकडे युद्धाची परिस्थिती बनली असताना नागपूर पोलिसांनी एका पत्रकाराला अटक केली आहे. सोशल मीडियावर देशाविरोधीत मजकूर लिहिल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित पत्रकाराच्या मैत्रिणीला देखील ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली जात आहे. नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी ही कारवाई केली.
