
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा: “दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार” अशी जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगली असताना, आमदार रोहित पवार यांनी यावर भाष्य केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मला आश्चर्य वाटणार नसल्याचे वक्तव्य अनौपचारिक बैठकीत केले होते. राष्ट्रवादीतील मनोमिलनाचा निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याचे पवारांनी म्हटले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले.
