
चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा
माननीय अजित दादांच्या उपस्थिती संपन्न…
पुणे-: गुरुजनांच्या प्रति मनातून आदरभाव व्यक्त करण्याच्या हेतूने गणेश कला क्रीडा सभागृह तुडुंब भरले होते तर मान्यवरांच्या मौलिक विचारांनी मंत्रमुग्ध झाले.
ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर आणि ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांना मा. अजितदादा व मोनिकाताई मोहोळ यांच्या हस्ते गुरुजन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, मोत्याची माळ, पुस्तके आणि विठ्ठलाची मूर्ती देत की मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
तर आंतरराष्ट्रीय क्रीडापटू आलोक मनोज तोडकरला अजितदादांच्या हस्ते 51 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
गुरुजन गौरव सोहळ्याच्या विसाव्या वर्षपूर्ती निमित्ताने गुरुवंदना हे कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.
अजितदादा यांनी गुरू हेच समाजातील खरे दीपस्तंभ असल्याने गुरूंचा गौरव करणे कर्तव्य असल्याचे सांगितले.
अरुणजी फिरोदिया, विजय कुवळेकर आणि शमा भाटे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रसंगी मोनिकाताई मोहोळ, आप्पासाहेब रेणुसे, विजय जगताप, अंकुश काकडे, दीपक मानकर, दत्ता धनकवडे, रमेशबापू कोंडे, जालिंदरभाऊ कामठे, भालचंद्र जगताप, अभयशेठ मांढरे व मान्यवर तसेच नागरिक उपस्थिती होते.
युवराज रेणुसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
