
दि. ०२ ऑगस्ट, पुणे -;कार्यसिद्धी प्रतिष्ठान महिला परिवाराच्या वतीने आज भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने या भागामध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासोबतच वंडर सिटी व नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर असणाऱ्या अनधिकृत झोपडपट्टीतील पोरांबद्दल देखील वाढलेल्या तक्रारी निदर्शनास आणून दिल्या. त्याचबरोबर वाहतूक विभाग व महानगरपालिका संबंधित विषयावर देखील सकारात्मक चर्चा झाली.
“कात्रज पार्लर ३ ते पार्लर २ ते कार्यसिद्धी प्रतिष्ठान कार्यालय” या मार्गिकेवर असणाऱ्या दुतर्फा पार्किंग चा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. एवढेच नाही तर त्या पार्किंग मध्ये असणाऱ्या अनोळखी अवजड वाहनांच्या मागे दारू पुण्याचे अड्डे तयार होत असल्याचे देखील निदर्शनास आणून दिले.
निवेदनावर बोलताना श्री. खिलारे साहेब म्हणाले,
“उपरोक्त विषयाबद्दल पोलीस प्रशासन गंभीर असून याची दखल घेण्यात लवकरच आम्ही योग्य ती कारवाई करू. त्यासोबतच यातील काही मुद्यांसाठी वाहतूक विभाग व महानगर प्रशासन यांच्याशी देखील बोलणी करून लवकरच यातून देखील मार्ग काढता येईल.”
याप्रसंगी कार्यसिद्धी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री. गिरिराज सावंत म्हणाले,
“पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग व महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयासोबत सहकार्याची भावना ठेवत कार्यसिद्धी प्रतिष्ठान सदैव एक पाऊल पुढे टाकेल. आज देखील निवेदनावर उत्तर देताना खिलारे साहेब यांनी सांगितलं की, ‘कॅमेरा जर त्या ठिकाणी असेल तर प्रशासनाला कर्तव्यावर असताना त्याचा फायदा होईल’ यालाच अनुसरून कार्यसिद्धी प्रतिष्ठान या भागामध्ये पुढील १५ दिवसात स्वखर्चातून २५ CCTV लावून घेईल अशी खात्री देतो’
याविषयावर सविस्तर प्रतिक्रिया देत महिला भगिनींनी देखील आपली मते मांडली. या प्रसंगी सौ. राजेश्वरी (ताई) सावंत, मोनालीताई जाधव, शांता खानविलकर, लीना, सघोडकर, वर्षा जरड, दीपाली नेटवे, मनोरमा जिते, तापकीर काकू व महिला भगिनी उपस्थित होत्या.
