
कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने नेहा चिकने यांचा विशेष सन्मान
कात्रज ;-
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत कु. नेहा विठ्ठल चिकने यांनी मोठे यश संपादन करत ‘सहाय्यक गट विकास अधिकारी पदी’ त्यांची निवड झाली आहे.
संपूर्ण दक्षिण पुणेकरांसाठी ही आनंदाची बाब असून प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिनाऱ्यांसाठी ही अनुकरणीय यशोगाथा असून त्याचा हा प्रेरणादायी प्रवास आहे.
या मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.गिरीराज (भाऊ) सावंत यांनी कु. नेहा यांच्या निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कु. नेहा चिकणे यांचे परिवारातील सदस्य व कार्यसिद्धी परिवारातील सदस्य रघुनाथ कड व अतिश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
