
धनकवडी-: बालाजीनगर येथील स्वराज्य महाविद्यालयात देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मिलिंद पन्हाळकर, राजाभाऊ पासलकर, मिलिंद डवरी; नानासाहेब थोपटे, रेऊशेठ गाडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक छबु बेरड (क्राईम ब्रँच), लालाशेठ निवते, संतोष राजपूत, राहुल गवळी, अनिल शिरोळे, संजय पन्हाळकर, तसेच संस्थेचे संस्थापक गोपाल खंडारे सर, संस्थेच्या सचिव सौ. प्राची गोपाल खंडारे, प्राचार्य डॉ.भारत जिंतूरकर उपस्थित होते.
प्रसंगी गोपाल खंडारे सर यांनी विद्यार्थी तसेच संस्थेतील सर्वांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन फिजिकल डायरेक्टर प्रा.डॉ.उमेश जाधव यांनी केले. यावेळी संस्थेचे अभिजीत बनसोडे, सुरेश पाटणकर, अजय मिस्त्री, रामदास सरकटे, पूनम खुटवड, गणेश तावरे, सौ छाया शिंदे, चांदनी पवार, प्रज्ञा मांजरे. प्रीती जाधव. अक्षता नलवडे. सौ निकिता गिरमे, अनिल नामवाड, सुशांत पडगळ यासह महाविद्यालयातील शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी व एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शुभांगी माने यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राची खंडारे यांनी मानले.
