
कात्रज, पुणे:-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवा निमित्त इस्कॉन एन व्ही सी सी, कात्रज कोंढवा रोड येथे दोन दिवसीय विशेष पूजापाठ भजन,पूजन, दर्शन तसेच चोवीस तास दर्शनाची सोय करण्यात आली होती, लाखो भाविकांनी दर्शना बरोबरच महाप्रसादाचा लाभ घेतला.
यानिमित्ताने येथील मंदिरामध्ये तेलंगणा भाजपा नेत्या डॉ माधवी लता जी तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी आपल्या परिवारासह तसेच जेष्ठ वैज्ञानिक विजय पांडुरंग भटकर त्याच बरोबर राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भक्तासह सर्वच उपस्थित सर्वांचेच स्वागत मंदिराचे पदाधिकारी अमर सोनवणे व ॲड अभिजीत साकुरकर यांनी केले. 15 व 16 ऑगस्ट या दोन दिवसांत साधारण दीड लाखाच्या वर भाविकांनी दर्शन घेतले व प्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्ताने मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. जन्माष्टमीच्या निमित्ताने मंदिरात चोवीस तास अखंड भजन कीर्तन सुरू होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते भगवंताला अभिषेक करण्यात आला. सर्व मान्यवरांचे मंदिराच्या वतीने स्वागत करण्यात आले.
मंदिराच्या वतीने अनंत गोपदास,
श्वेतद्विप दास, अमर सोनवणे. ॲड अभिजीत साकुरकर, सौम्य नीताई दास, राधिका विनोद प्रभू, बापू नवले, सत्यवान पांचाळ, मनोज नायडू, पार्थ सोनवणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
