
आंबेगाव बुद्रुक-: महापालिका सहाय्यक आयुक्त धनकवडी – सहकारनगर कार्यालय अंतर्गत फेरीवाला नोंदणीकृत प्रमाणपत्र धारक भाजी व्यवसायिकांना व्यवसायासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ओटा मार्केट दत्तनगर येथे गाळे देण्यात आले होते, परंतु सदर ठिकाणी व्यवसाय न करता भाजी विक्रेते हे दत्तनगर जांभूळवाडी मुख्य रस्त्यावर व्यवसाय करत असल्याचे निदर्शणास आले होते, यामुळे सदर भागातील नागरिकांना वाहतुकीला मोठा अडथळा होत होता.
त्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट पासून अधिकृत व्यवसायधारक यांना नेमून देण्यात आलेल्या जागेवर व्यवसाय करण्यासाठी भाजी विक्रेत्यांची बैठक, चर्चा करून त्यांचा अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यात आल्या व आज मनपा उपायुक्त संदीप खलाटे यांच्या उपस्थितीत सदर सावित्रीबाई फुले ओटा मार्केट पुनःश्च सुरु करण्यात आला आहे. प्रसंगी मा उपायुक्त यांनी सर्व भाजी विक्रेतांशी संवाद साधून स्वतः भाजी देखील खरेदी केली.याबाबत सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे मॅडम यांनी सांगितले की यापुढे सदर भाजी मंडईमुळे वाहतुकीला होणारी अडचण कमी होऊन नागरिकांना एकाच ठिकाणी मंडईची सोय होणार आहे.
यासाठी अतिक्रमण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली असून सदर ठिकाणी आरोग्य विभागामार्फत दैनिक स्वछता सेवकाची नेमणूक करण्यात आली आहे…..
