
धनकवडी-:
भारती विद्यापीठ गेट मागील बाजूस ते त्रिमुर्ती चौक व राजर्षी शाहू बँक सातारा रस्ता ते गुलाब नगर या ठिकाणी वारंवार येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीमुळे व त्याना होणाऱ्या त्रासामुळे मा.महापालिका आयुक्त यांचे वाढत्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई आदेशानुसार आज दि.१३/५/२०२५ रोजी धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विकास विभाग यांचे मार्फत संयुक्त कारवाई मध्ये रस्ता व पदपथावरील तसेच इमारतीच्या फ्रंट व साइड मार्जिन मधील अनधिकृत अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली .
सदर कारवाई मा संदीप खलाटे, उप आयुक्त अतिक्रमण निर्मूलन विभाग, मा.तिमय्या जंगले महापालिका सहाय्यक आयुक्त, यांचे नियंत्रणाखाली कारवाईसाठी,कनिष्ठ अभियंता ,विभागीय अतिक्रमण अधिकारी नारायण साबळे.
प्रवीण भावसार ,उपअभियंता वंदना गवारी,शाखा अभियंता मोहन चव्हाण,कनिष्ठ अभियंता गणेश ढगे, अतिक्रमण निरीक्षक सागर विभुते ,अविनाश धरपाळे सहा.अतिक्रमण निरीक्षक,राहुल बोकन,अतुल ब्राह्मणकर,अविनाश बागुल,रवी आडे,संदीपान भागडे , सोनाली बोरगावकर, पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा बल व बिगारी सेवक इ सेवक, १ जे सी बी, ४ ट्रक इ.विभागाकडील स्टाफ हजर होता.
कारवाई मध्ये 5000 स्के.फूट कच्चे/पक्के बांधकाम मोकळे केले.तसेच -…,काऊंटर – १५, शेड – २३ व इतर साहित्य – ३०, जवळपास ०६ ट्रक साहित्य जप्त केले
सदरची कारवाई यापुढे देखील मोठ्या प्रमाणात चालूच राहणार आहे.
