धनकवडी: आंबेगाव पठार येथील ३४ वर्षीय विवाहित महिलेने पतीच्या प्रेयसीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पती आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव माधुरी विकास कोकणे (वय ३४, रा. अष्टविनायकनगर, आंबेगाव पठार) असे आहे. तिच्या पतीचे नाव विकास कोकणे (वय ३६) असून प्रेयसीचे नाव अर्चना आहिरे असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास कोकणे याच्यावर आणि अर्चना आहिरे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, विकास कोकणे याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात माधुरीचा भाऊ आशिष आळगट (वय २२, रा. धाराशीव) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, विकास कोकणे याचे गेल्या काही वर्षांपासून अर्चना आहिरे हिच्याशी अनैतिक संबंध होते. माधुरीने याबाबत विचारणा केली असता, विकासने तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला. तसेच “मला व्यवसायासाठी १० लाख रुपये आणून दे, तरच मी अर्चनाला सोडतो,” असे सांगितले.
अर्चनानेही वारंवार माधुरीला फोन करून “तू तुझ्या पतीला सोड, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे,” असे म्हणत मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून माधुरीने १० मे रोजी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सांगितले की, “विकास कोकणे लोनावळ्यात खासगी पशुसंवर्धन व्यवसाय चालवतो. त्याचे अर्चनाशी असलेले अनैतिक संबंध माधुरीला कळले आणि त्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.”