
धनकवडी-:
शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती रायगड व दुर्ग संजीवनी सामाजिक संस्था यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं यात ७२ जणांनी सहभाग नोंदवत lरक्तदान केले.
धनकवडी येथील शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय केंद्रात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे व नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या हस्ते झाले पार पडले.
या रक्तदान शिबिराला तरुणांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत रांग लावली होती. धनकवडी कात्रज व आंबेगाव परिसरातील 72 जणांनी रक्तदान केले यात 15 महिलांचा समावेश होता.
या शिबिरात आधार रक्तपेढी धनकवडी यांनी रक्त संकलन केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दुर्ग संजीवनी सामाजिक संस्थेचे बापू कुतवळ, निलेश धावडे, सुरज खांदवे, सर्वेश नवघणे यांनी विशेष प्रयत्न केले.
रक्तदान हे जीवनदान असून हा रक्तदान शिबिराचा सामाजिक उपक्रम राबविला
व उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे बाळाभाऊ धनकवडे तसेच युवराज बेलदरे यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या….
