Q
महापालिकेच्या आयुक्तपदाची माळ नवल किशोर राम यांच्या गळ्यात. राज्य सरकारने अधिकृतपणे नियुक्ती केली असून ३१ मे 2025 रोजी पुणे महानगर पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारतील.
याआधी ते पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. प्रशासनात प्रभावी निर्णयक्षमता दाखवत पुण्यातील विविध शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच आता येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नियुक्ती विशेष महत्त्वाचे आहे.
नवल किशोर राम हे 2003 बॅचचे आयएएस अधिकारी असून, सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. तिथून त्यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासनातील मोठ्या अनुभवामुळे पुण्यातील शासकीय आणि नागरी कामकाजात गती आणतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
