
ऐश्वर्य कट्ट्यावर आज मानकरी होते.
सिनेसृष्टीतील आगळेवेगळे व्यक्तिमत्व प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक प्रवीणजी तरडे व जेष्ठ गायक जितेंद्रजी भुरूक.
ऐश्वर्य कट्ट्यावर दोघांच्या उपस्थितीत गप्पांची बहारदार मैफल मध्ये सगळेच रमून गेले होते.
शेतकरी कुटुंबातील असून देखील दोघांनी आपापल्या क्षेत्रात मैदान गाजवत खेळाची आवड जोपासली आहे.
प्रवीण तरडे एरवी चित्रीकरणामध्ये प्रचंड व्यस्त असतात मात्र प्रवीण तरडेंनी आज कट्ट्यावर अगदी मनमोकळेपणाने भरपूर वेळ देत आपल्या आयुष्याची संघर्षमय वाटचाल उलगडली तसेच मुळशी पॅटर्न चित्रपट पाहून विकल्या नाही हेच चित्रपटाचे यश असल्याचे सांगत. ऐश्वर्य कट्टा म्हणजे विचारांचं ऐश्वर्य आसल्याचे सांगत कौतुक केले.
केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ जसे दिसतात त्याहीपेक्षा मनाने अधिक देखणे असून मंत्री झाल्यावर देखील मैत्री जपल्याचे सांगितले.
गायक जितेंद्र भुरूक यांनी आपल्या गाण्यांनी आणखीनच मैफर रंगतदार केली. तेरे जैसा यार कहाँ, जिंदगी मिल के बियाएंगे, ये दोस्ती हम नही छोडेंगे ही गाणी सादर करून सर्वांचीच मने जिंकली.
दोन्ही मान्यवरांचे ऐश्वर्य कट्ट्याच्या प्रथेप्रमाणे आपुलकीने स्वागत करत शाल, मोत्याची माळ, राजेशाही फेटा, पुस्तके, सन्मानपत्र आणि विठ्ठलाची सुंदर मूर्ती देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी अभयशेठ मांढरे, सचिन नाईक, विकास कोटवाल, अप्पासाहेब रेणुसे व मित्र परिवार उपस्थित होता
