जल्लोष मुलांचा, सांस्कृतिक आनंदाच

शिक्षणमहर्षी स्व.विलासराव तांबे फौंडेशन ज्ञानविलास व्यासपीठ व कँडेन्स डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील २५ दिवसापासून आपल्या भागातील मूल-मुली, महिला-भगिनी यांच्यासाठी आयोजित केलेल्या फ्री डान्स वर्क शॉप समर कॅम्प 2025 चा समारोप सोहळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात संपन्न झाला..
प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना शर्वरी जेमीनीस यांच्या उपस्थितीत व प्रसिद्ध कोरियोग्राफर मानसी कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम व नाविन्यपूर्ण कलाकौशल्य शिकवत उत्साहात संपन्न झाल्याची व दरवर्षी घेत असल्याबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी अनेक सोलो डान्स, गृप डान्स, थीम डान्स, बॉलिवूड डान्स,संस्कृती व संस्कारक्षम नाट्यप्रयोग मुलांनी केले हे पाहून डोळ्याचे पारणे फिटले.
काही दिव्यांग मुलांच्या सहभागाने व नृत्याविष्काराने डोळे पाणावले.. यावेळी विविध पारितोषिके व बक्षिसे वितरण करून शिबिरार्थीना प्रशस्तीपत्र देण्यात आले….
आयोजक विशाल तांबे त्याचबरोबर परिसरातील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि पत्रकार पालक मंडळी उपस्थित होती
