जयहिंद फाउंडेशन (हिंदुस्थान) च्या वतीने कोल्हापूर येथे हुतात्मा सैनिक परिवार सन्मान सोहळ्याचे आयोजन …

जयहिंद फाउंडेशन (हिंदुस्थान) च्या वतीने कोल्हापूर येथे हुतात्मा सैनिक परिवार सन्मान सोहळ्याचे 01 जून २०२५ रोजी आयोजन केले होते.
जानेवारी २०२४ ते डिसेम्बर २०२४ दरम्यान देशसेवा बजावताना आपले प्राणार्पण करणाऱ्या आकरा सैनिक परिवारातील विरपत्नी, विरमातांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यामध्ये सौ वृषाली प्रकाश खरात, सौ.सुनीता अनिल कळसे, सौ.राजलक्ष्मी अविनाश कागीनकर, सौ.गीता उदय घुगरे, सौ.भाग्यश्री तुषार घाडगे, सौ.पूजा नितेश मुळीक, सौ.मोनाली पोपट खोत, सौ.वसुंधरा संजीवकुमार भोसले, सौ.कोमल अमर पवार, सौ.तेजस्विनी सुनील सलाम, सौ.प्रियंका निलेश खोत (यांचा वीरमाता कांता अशोक खोत यांनी पुरस्कार स्वीकारला) आदींचा शाल, श्रीफळ, साडीचोळी, सन्मानचिन्ह, संविधान पत्र प्रतिमा देत सन्मान मान्यवर मंडळींच्या हस्ते करण्यात आला.
या विशेष प्रसंगी जेष्ठ इतिहासकार डॉ. वसंतराव मोरे, आमदार शेखर निकम,(चिपळूण) श्री. ज्ञानेश्वर मुळे,माजी परराष्ट्रीय सचिव भारत सरकार, कॅप्टन (मानद) शंकरराव पाटील, (अधीक्षक सैनिकी मुलांचे वसतिगृह) राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, सचिव हनुमंत मांढरे,जयहिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय संचालक, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, जयहिंद फाउंडेशनच्या सातारा, पुणे, मुंबई, बारामती, जावली, वाई, खटाव, कोल्हापूर, तसेच विविध शाखांचे पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक, स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी सैनिक टाकळी या गावाचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सातारा येथील विरपत्नीची मेस्कोच्या वतीने सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच विशेष कार्य म्हणून काही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर टीमचे प्रमुख डॉ. केशव राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ. नितीन कदम आणि प्रा. संदीप तावरे यांनी केले, प्रास्ताविक संदीप माने आणि हनमंत मांढरे यांनी केले, आभार ॲड जयदीप भोसले यांनी मानले.
अत्यंत भावनावश अशा कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच राष्ट्रगीताने झाली तर सांगता वंदेमातरम ने करण्यात आली.
