चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. फुलचंद चाटे यांनी विद्यार्थ्यांना योग करण्याबद्दल मार्गदर्शन केले

आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने कात्रज येथील संत तुकाराम इंग्लिश मीडियम स्कूल जुनियर कॉलेज या ठिकाणी बाराशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये योगसाधना करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक तसेच मार्गदर्शन त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नियमित करण्यासाठी असलेले योगाचे विविध प्रकार सांगण्यात आले.
तसेच योग दररोज करून जास्तीत जास्त फायदे करून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले.
प्रसंगी चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्राध्यापक फुलचंद चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य गौरव राऊत प्रशासक सुवर्णा कुलकर्णी, परीक्षा विभाग प्रमुख प्रतीक बिक्कड, सुपरवाजर प्रियंका धुमाळ, स्पोर्ट टीचर राजेंद्र वाडकर, पल्लवी माळवे तसेच शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्राध्यापक फुलचंद चाटे यांनी सांगितले की योग ही प्राचीन संस्कृती असून या योगाला 2015 पासून जागतिक मान्यता मिळाली. 21 जुन सर्व ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
योग करण्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते तसेच लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढून अभ्यासात सुधार होतो अभ्यास व परीक्षेचा ताण तणाव, चिंता कमी होते. अभ्यासामध्ये आत्मविश्वास, उत्साह वाढतो आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते.
तसेच मानसिक स्वास्थ सुधारल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावनाचे व्यवस्थापन करून सकारात्मक विचार करण्याकडे कल वाढत असल्याचे यावेळी सांगितले.
