
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे अवचित्य साधत आज सुप्रभात योगसाधना केंद्र धनकवडी येथे सुप्रभात योगाचा वर्धापन दिन भारती विद्यापीठ जेष्ठ नागरिक संघ संचालित, सुप्रभात योग व आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिक धनकवडी यांच्या विद्यमाने साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने कार्यसिद्धी प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गिरीराज तानाजीराव सावंत यांच्या वतीने सौ राजश्री गिरिराज सावंत यांनी योगसाधकांना योगा सतरंजीचे वाटप तसेच उपस्थित योग गुरूंचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास सौ राजश्री सावंत भारती विद्यापीठ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकररावजी पाटील, उपाध्यक्ष दिनकररावजी सूर्यवंशी, कार्याध्यक्ष तानाजीराव शिंदे, संचालक चंद्रकांत देशमुख, आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिकचे डॉ. विक्रांत पाटील व डॉ.सुषमा पाटील यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ धिमते यांनी केले, कार्यक्रमाचे नियोजन डॉ. विक्रांत पाटील व डॉ.सुषमा पाटील सुप्रभात युगाचे प्रमुख विश्वासराव भोईटे, संचालिका विजया हांडे, अरविंद अवताडे, सदानंद सोनवणे, नारायणराव पासलकर, विष्णू बढे, मराठा महासंघाचे संपर्कप्रमुख अनिल तागडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
मोठ्या प्रमाणात महिला व जेष्ठ नागरिक आणि साधकांची उपस्थिती व साधकांचे विशेष सहकार्य लाभले. कार्याध्यक्ष नाना उर्फ तानाजी शिंदे यांनी आयोजक तसेच उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रीय योगपटू संकल्प विक्रांत पाटील यांनी विविध प्रकारची योग प्रात्यक्षिक सादर केली.
