
पालकांसाठी मोफत विशेष मार्गदर्शन सत्र संपन्न
स्व. श्री. संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्ट आणि TOPPER’S अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मुलांना घडवताना पालकांची जबाबदारी” या विषयावर आधारित मोफत मार्गदर्शन सत्र राधाकृष्ण गार्डन आंबेगाव येथे उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, स्व. श्री. संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक युवराज बेलदरे, अॅक्टिव फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत लिपाने, आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, यांची विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमातील संवाद, अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
