बनावट ओळखपत्रासह राहणाऱ्या दोन बांग्लादेशी महिलांसह एका पुरुषास आंबेगाव पोलीसांनी केले जेरबंद
आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगिनी निवास, आनंद पार्क, आंबेगाव खु येथील महिला लीझा मकबूल शेख, रा. स.नं ४८/१/१६, फ्लॅट नं २,
या वारंवार बांग्लादेश ला जात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याबाबत खात्री करन्यासाठी आदेश मिळाले होते.
त्याप्रमाणे आंबेगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जात खात्री केली असता, ती महिला पत्ता बदलून दुसरीकडे राहण्यास गेली असल्याचे कळाले.
सदर महिलेबाबत गोपनीय सूत्राकडून माहिती घेत शोध घेतला असता सदरची महिला सिध्दीविनायक सोसायटी फ्लॅट नं ३१० आंबेगाव खुर्द पुणे या ठिकाणी राहत असल्याची माहिती अंमलदार सागर नारगे यांना मिळाल्याने सदर ठिकाणी व.पो.निरिक्षक शरद झिने, पो.उप निरिक्षक युवराज शिंदे यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला असता. संशयित महिला लीझा मकबूल शेख मिळून आली.
तसेच तीच्या सोबत तिची बहीण रिंकी देवी व बहीणीचा पति प्रमोद कुमार चौधरी ग्राम फतेहपुर, पोस्ट सीनावों, थाना परवलपूर, पर्बलपुर, नालंदा, बिहार हादेखील मिळून आला.
सदर महिलेची विचारपूस करता त्यांनी भारतीय असल्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट व इतर कागदपत्रे सादर केली.
मात्र संशयावरून राहत्या घराची झडती घेतली असता संशयित महिला लीझा मकबूल शेख हीचा बांग्लादेशचा पासपोर्ट मिळून आला त्याआधारे ती महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे सिद्ध झाले,
तिचे खरे नाव खातून तस्लीमा, वडीलांचे नाव मकबूल, पतीचे नाव मोफीजुर रेहमान (मयत) तसेच तिचे बहिणीचे नाव रिंकी देवी ऊर्फ खातुन तमीना मकबुल मोरल रा. गाव-चाँदपाडा, पोस्ट हमीदपुर, ठाणा-कोतवाली, राज्य. जैसुर, बांगलादेश असे असल्याने सदरची महिला बांग्लादेशी असल्याची खात्री झाली.
रिंकी ऊर्फ तमीना हिच्या सोबत असणारा पुरुष प्रमोद कुमार चौधरी गाव फतेहपुर, पोस्ट सीनावों, थाना परवलपूर, पर्बलपुर, नालंदा, बिहार याचेसोबत विवाह केला असून त्यानेच या दोन्ही महिलांना बनावट ओळखपत्रे बनवून दिल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांना ताब्यात घेन्यात आले.
आंबेगाव पोलीस ठाणे येथे त्यांचेविरुध्द गु.र.नं १३१/२०२५, भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१३) (अ) (ब), १२ (२) सह विदेशी व्यक्ती अधिनियम सन १९४६ चे कलम १४ अ (अ) (ब), १४ ब, १४ क प्रमाणे गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची महत्त्वपूर्ण कारवाई मा. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील,
सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे यांचे मार्गदर्शना खाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले, पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अंमलदार निलेश जमदाडे, सागर नारगे, प्रमोद भोसले, स्वप्निल शर्मा, महिला पोलीस अंमलदार पूजा खवले यांच्या पथकाने केली.
