
प्रा. फुलचंद चाटे “आजचा विद्यार्थी सन २०४०-५० च्या समाजाचा आधारस्तंभ असेल
कात्रज पुणे:-आजचा विद्यार्थी हा उद्याचा निर्णयकर्ता असून, त्याला योग्य दिशा देणे हे फक्त शिक्षकांचेच नव्हे तर पालकांचंही कर्तव्य आहे. “सुजाण पालक म्हणजे समाज घडवण्याचे एक महत्त्वाचे शस्त्र आहे,” असे मत माजी प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
चाटे शिक्षण समूहाच्या वतीने अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पद्मावती, पुणे येथे आयोजित “चला सुजाण पालक होऊया” या प्रेरणादायी कार्यक्रमात देशमुख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमास पुणे व परिसरातील हजारो विद्यार्थी व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या वेळीपद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहातील कार्यक्रमाप्रसंगी दीपप्रज्वलन करताना मान्यवर.
प्रमुख पाहुणे माजी प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख, चाटे समूहाचे पुणे विभागीय संचालक प्रा. फुलचंद चाटे, विविध शाखांचे प्राचार्य व शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा. फुलचंद चाटे म्हणाले, “आजचा विद्यार्थी सन २०४०-५० च्या समाजाचा आधारस्तंभ असेल. त्या दृष्टीनं त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा भाग व्हायला हवे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. “हा कार्यक्रम आमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला आहे. आता अभ्यासात अधिक शिस्त आणि ध्येयपथ ठरवून आम्ही वाटचाल करू, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चाटे शिक्षण समूहातील प्राचार्य वैशाली चाटे, नामदेव माने, नवनीत राजपाल, रणजित जगताप, सौरभ अंकम, गौरव राऊत, रत्नाकर सोनवणे, विष्णू पालवे, प्रवीण जावळे, सचिन ढाकणे, प्रशांत जाधव, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली.
सूत्रसंचालन रेश्मा पठाण यांनी, तर आभारप्रदर्शन गौरव राऊत यांनी केले.
