
‘हर घर तिरंगा’ उपक्रम तसेच महापालिका अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : ‘ पुणे महानगरपालिकेच्या महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागातर्फे आयोजित केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियाना अंतर्गत तसेच महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त शौर्य, धैर्य, लष्कर सेवेतील अतुलनीय पराक्रमाचा आविष्कार, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा तसेच समाज सेवेमध्ये ऐतिहासिक काम करणाऱ्या माजी सैनिकांच्या गौरव सोहळ्याचे! बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, सहआयुक्त गोविंद दांगट, राजेश कादबाने, तिमय्या जंगले, सांस्कृतिक विभाग उपायुक्त सुनील बल्लाळ, प्रशासन अधिकारी राजेश कामठे, दीपक राऊत, सुरेखा भणगे, प्रशासकीय अधिकारी संगीता कोकाटे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘राजमाता जिजाऊ की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा तसेच
विशेष सन्मानार्थी मध्ये वीरचक्रप्राप्त कर्नल सदानंद साळुंखे, हवालदार बजरंग निंबाळकर, कॅप्टन परशुराम शिंदे, कॅप्टन बाबू जाधव, सुभेदार मेजर हेरंब सालेकर, सुभेदार मेजर विवेकानंद घाडगे, नायक पोपट महाजन, हवालदार अशोक कड, नायक सदाशिव पाटील, नायक सुखदेव भोसले, ऑडनरी फ्लाईट लेफ्टनंट श्यामराव चव्हाण, तसेच पॅरा ऑलिंपिकमध्ये सहभागी रफीक लतिफ खान या सर्व सेवा निवृत्त सैनिकांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना परशुराम शिंदे यांनी महापालिकेच्या वतीने माजी सैनिकांचा गौरव केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रास्ताविक सुनील बल्लाळ यांनी केले.
अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित बोधचिन्ह स्पर्धा, माझी वारी वेषभूषा स्पर्धा तसेच आषाढी वारी छायाचित्र स्पर्धेच्या विजेत्यांना आणि परिक्षकांना गौरविण्यात आले.
या निमित्ताने हिंदी व मराठी देशभक्तीपर गीतांच्या ‘माँ तुझे सलाम’या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची होती तर सूत्रधार निकिता मोघे होत्या. केतकी महाजन-बोरकर यांनी संयोजन केले. जितेंद्र भुरुक, गणेश मोरे, अश्विनी खुरपे, आकाश सोळंकी, माधुरी भोसेकर यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी यांनी केले तर आभार राजेश कामटे यांनी मानले
