
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे (Velhe Taluka) नवे नाव राजगड (Rajgad) असं देण्यात आलं आहे. राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला होता. वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता देखील मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचे राजपत्र जारी होणार आहे.
