
कात्रज: दक्षिण पुण्यात एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता मात्र नागरिकांच्या विरोधानंतर चार दिवसांनी तो मागे घेण्यात आला. परंतू कात्रज कोंढवा रोड भागात एक दिवस कपात पूर्वीप्रमाणे सुरूच आहे.त्याच बरोबर संतोष, नगर, अंजनी नगर या भागात अघोषित व अवेळी पाणी पुरवठा करण्यात येतो त्यामुळे कात्रजचे पाणी कुठे मुरतेय असा सवाल कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष नमेश बाबर यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारला.
कात्रज करांवर अघोषीत क्लोजर त्याचबरोबर अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने वंडर सिटी कडून मंहमदवाडी कडे जाणाऱ्या पाईपलाईनचे काम आम्ही होऊ देणार नाही असे कात्रज विकास आघाडीचे नमेश बाबर यांनी सांगितले.कात्रज करांनी पाण्याच्या टाक्यांसाठी विना मोबदला जागा दिल्या या टाक्यांमध्ये 120 एमएलडी पाणी साठवणूक होते या मग हे पाणी नेमकं जातंय कुठे? या ठिकाणी असणारे बिसलरीचे प्लांट,अनधिकृत वॉशिंग सेंटर यांच्यावर कारवाई का होत नाही.आमच्या वाट्याचं पाणी आम्हाला मिळत नसेल तर आम्ही काय फक्त आंदोलनेच करायची का. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला दया.अन्यथा आम्ही कामे होऊ देणार नाही असा इशारा ही नमेश बाबर यांनी दिला. तर मनपाचे पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीकांत वायदंडे यांनी यावेळी सांगितले की ज्या काही अडचणी कात्रज करांना असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू तसेच दोन एम एल डी पाणी वाढवता येते का ते देखील पाहू.यावेळी कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष नमेश बाबर,स्वराज बाबर,
उपअभियंता नितीन खुडे,उपअभियंता मुकेश पवार,प्रशांत कुंभार,कनिष्ठ अभियंता तृप्ती फफाळ नाना पवार,संजय शिंदे उपस्थित होते.
संपादक बजरंग निंबाळकर
