
कात्रज, : पुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच कात्रज डेअरीने दुध विक्री दरात २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे कात्रज दूध ग्राहकांना फटका बसणार आहे. संघाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने तसेच वाहतुक व इतर खर्चात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने सोमवारपासून (ता. १२) दूध विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सहमतीने घेतला असल्याचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले आहे.
- यापूर्वी कात्रज डेअरीने गतवर्षी मार्च महिन्यात प्रतिलिटर २ रुपयांनी दूधविक्री दरात वाढ केली होती. २ रुपयांची दरवाढ केल्याने मात्र आता पुणेकरांच्या खिशाला झळ बसणार आहे. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे, दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी दूध दरवाढ करावी लागली, असल्याचे डेअरी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
——-
दर पुढील पमाणे………
——-दूधाचे प्रकार—-जुने दर (प्रति लिटर) —-नविन दर (प्रति लिटर)
फुल क्रिम मिल्क—७२–७४
प्रमाणित दूध—६२–६४
संपादक बजरंग निंबाळकर
