खटाव-:
अंबवडे (खटाव) गावचे सुपुत्र अच्युत रमेश बुधे (बीएसएफ जवान) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त वीरपत्नी सौ प्राजक्ता अच्युत बुधे यांचा सुवासिनीचे सौभाग्य अलंकार व वाण देऊन सन्मान.
प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह.भ.प. धीरज महाराज वलेकर यांचे भारावून टाकणारे कीर्तन व वीरपत्नी सौ प्राजक्ता यांना जयहिंद फाउंडेशनच्या वतीने सौभाग्य अलंकारासह दिलेलं वाण, त्याच बरोबर वीरमाता सौ राधाबाई यांचा साडी चोळी देऊन केलेला सन्मान हा क्षण सर्वांना भावनिक करत मनाला सुन्न करत होता.
यावेळी प्राजक्ता ताईंचा विरपुत्र छोटा सक्षम आईचे सौभाग्य अलंकारांमधील खुलून दिसणारे रुप इवल्याश्या डोळ्यानी टक लावून पाहत होता तर आदिराज विधीची जबाबदारी पार पाडत होता.
प्रसंगी जयहिंद फाउंडेशन खटाव तालुका अध्यक्षा सौ हेमलता फडतरे यांनी विधवा प्रथा मुक्ती बद्दलचे दिलेले पत्र व आव्हानाला आंबवडे गावच्या सरपंच शालन बुधे व ग्रामस्थ यांनी हात उंचावून दिलेली संमती ही देखील विशेष बाब होती.
या कार्यक्रमाला सरपंच शालन बूधे, जयहिंद फाउंडेशन खटाव तालुका अध्यक्षा सौ हेमलता फडतरे, सौ.पूनम साळुंखे खजिनदार, जयहिंद फाउंडेशनच्या सदस्या सौ रंजना सूर्यवंशी, सौ वर्षा राऊत, सौ कमल चव्हाण तसेच वीरपत्नी सौ भारतीय रमेश जाधव, सौ सुषमा संग्राम फडतरे, सौ रेशमा गणेश कदम, सौ अश्विनी गणेश इंगळे आणि आंबवडे गावचे ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी हेमलता फडतरे यांनी विधवा प्रथा मुक्तीच्या लढ्यात सर्वांनी सहभागी होन्याचे व ही क्रांतीची ज्योत मनामनात रुजविण्याचे आवाहन सर्वांना केले.
