दत्तनगर येथे विजयी सन्मान रॅली

आंबेगाव बुद्रुक, पुणे
भारतीय जनता पार्टी मध्ये हवेलीचे नव नियुक्त अध्यक्ष संदीप भाऊ बेलदरे पाटील यांच्या वतीने आज विजय सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीचा शुभारंभ दत्तनगर चौक या ठिकाणी होऊन याची सांगता सरहद चौक या ठिकाणी करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने राजकीय सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील तसेच परिसरातील नागरिक महिला भगिनी माजी सैनिक त्याचबरोबर जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम यांचा जयघोष करण्यात येत होता. हातात तिरंगा झेंडा यामुळे देशप्रेम भावना निर्माण झाली होती.
विशेष उपस्थितांमध्ये भाजपाचे नेते जालिंदर कामठे त्याचबरोबर संदीप भाऊ बेलदरे, शुभांगी ताई बेलदरे, गणेश नलावडे, सुधीर निवगुने अमर चींधे यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जालिंदर भाऊ कामटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पहिला अटॅक नंतर देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी कठोर भूमिका घेत पाकिस्तान वरती जबरदस्त पद्धतीने हल्ला करत शेकडोच्या संख्येने आतंकवादी मारले गेले व आतंकवादी ठिकाणे उध्वस्त केली. पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले व विजयी हासिल केला याच विजया प्रीत्यर्थ म्हणून आज ह्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तर संदीप भाऊ बेलदार यांनी यावेळी सांगितले की सैनिकांच्या सन्मानार्थ ही रॅली असून पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी प्रसंगी घेतलेले कठोर निर्णय यामुळे देशाचे समरिक ताकत देशाला दाखविता आली तसेच पाकिस्तानचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सर्व देशवासीयांना व सैनिकांना नमन करत असून आज भर पावसात देखील सर्वांनी उस्फूर्तपणे सहभागी झाले याबद्दल सर्वांचे आभार मानले.
