
कार्यसिद्धी प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमी च्या सहकार्याने दक्षिण पुण्यातील थोरवे हायस्कुल च्या मैदानावर भव्यदिव्य ‘समर कॅम्प-२०२५’ चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या शिबिरामधे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हजारोंच्या संख्येने नोंदणी केली आहे. कमांडो ट्रेनिंग चे हे शिबीर या पुढे १५ दिवस चालणार असून
यामध्ये रायफल शूटिंग, टायर हरडल्स, टग ऑफ वॉर, रॉक क्लायंबिंग, सेल्फ डिफेन्स, लाठी-काठी यासारखे खेळ घेण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी कात्रज, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, गुलाब नगर, चैतन्य नगर, दत्त नगर सह परिसरातील सर्वच विद्यार्थी – पालकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र मिलीटरी ट्रेनिंग चे संचालक श्री मनोज नायडू हे मुख्य प्रशिक्षक या शिबिरासाठी उपस्थित असून अनेक अनेक प्रशिक्षक देखील कार्यरत आहेत.
शिबिराच्या उद्घाटनापासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यसिद्धी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री गिरीराज सावंत, राजेश्वरीताई सावंत, नाना निवांगुणे, आनंतराजे शिर्के, प्रसाद बाबर (सर), दत्तात्रय फाले साहेब, सुभाष यादव, दत्तात्रय चव्हाण, रवी कदम, जयंत पाटणकर, तुषार धुमाळ,रामदास कुंभार, राम देशमाने, अमर पवार, पांडुरंग मुळीक, संजय कोरटकर, सनी काळे, अतिश जाधव अमर देशमुख व इतर सर्व मान्यवर व कार्यसिद्धी प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते.

