
कात्रज : विकृतीची परिसीमा गाठणारा माणूस काय करू शकतो, हे दाखवणारी घटना पुणे जिल्ह्यातून उघड झाली आहे. घरी अल्पवयीन मुलं टीव्ही पाहण्यासाठी येत असताना नराधमाने एका अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढून नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने पीडित तरुणीसोबत आधी इन्स्टाग्रामवर मैत्री करून नंतर फोटो व्हयरल करण्याची धमकी देत अनेक वेळा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. हा प्रकार एप्रिल २०१९ ते आतापर्यंत सुरू होता. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. कैलास देशमुख नावाच्या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर तिचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केले
