
आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस यानिमित्ताने शिवसेना पुणे शहर खडकवासला विधानसभा मतदार संघ (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने आज तंबाखू विरोधी दिवस उपक्रम साजरा केला.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते व पी एम आर डी चे संचालक रमेश बापू कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम धनकवडी येथील सरहद्द चौकात तंबाखूजन्य पदार्थांची होळी करून साजरा करन्यात आला. यावेळी तंबाखू विरोधी प्रबोधनात्मक घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना पदाधिकारी नितीन पायगुडे, सतीश घाटे, विजय कणसे, संजय दिघे, सुरज परदेशी, संदीप काळे आदी मान्यवर व पदाधिकारी, स्थानिक नागरिक यावेळी सहभागी झाले होते.
शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आवाहनवरून राज्यभरात तसेच पूर्ण पुणे शहरातील आठही विधानसभा मतदार संघामध्ये तंबाखू विरोधी दीन व हा तंबाखूजन्य पदार्थांची होळी हा उपक्रम राबवला जात आहे.
यावेळी रमेशबापू कोंडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आज मोठ्या प्रमाणात युवा पिढी व्यसनाधीनतेकडे आकर्षित होत असून त्यामुळे आरोग्यावर होणारे घातक परिणाम मानसिक व आर्थिकदृष्ट्या होणारी हानी जाणीव करून देण्याच्या हेतूनं तसेच त्यांना भविष्य घडवणे त्यांना चांगल्या उद्योग व्यावसायिक मार्गाला लागावेत यासाठी प्रबोधनात्मक असा हा उपक्रम राबवला जात आहे. अशा प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम कायम सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले.
