
मयूर मसूरकर यांना विश्वबंधुता माय मराठी पुरस्कार
सातव्या बंधुता काव्य महोत्सवात मा. मयूर मसुरकर यांना विश्वबंधुता माय मराठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.. यावेळी महाराष्ट्रातील काही कवी, लेखक यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सरहद व स्वरगंधार च्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मसूरकर यांनी सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला याबद्दल सरहद परिवार, स्वरगंधार संगीत व साहित्य प्रसार संस्था , यशवंत प्रतिष्ठान, जनस्वराज सोशल अँड वेल्फेअर फाऊंडेशन या संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचे हस्ते त्यांना मायमराठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर , रयत शिक्षण संस्था, कर्जत, अहिल्यानगरचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांतदादा वानखेडे, कवयित्री संगीता झिंजूरके , मा.विलास ठोसर, डॉ. अरुण आंधळे, स्वागताध्यक्षा भारती जाधव हे मान्यवर उपस्थित होते. विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,औंध व काषाय प्रकाशन , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वबंधुता दिनानिमित्त या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते.
या पुरस्कारानिमित्त मनापासून सांगावेसे वाटते की यापुढे ही सरहद परिवार, स्वरगंधार संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य अखंडपणे चालू राहील.तसेच महत्वाच्या विषयांवरती परखड वास्तववादी लेखन करण्याचा माझा प्रयत्न राहील. या पुरस्कारासाठी माझी निवड केली व मला हा पुरस्कार दिला ,त्याबद्दल मी बंधुता परिवार , ज्येष्ठ कवी चंद्रकांतदादा वानखेडे व स्वरगंधार संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक मित्र बंधू गोपाळ कांबळे यांचा मनापासून ऋणी आहे. हा पुरस्कार आम्ही ज्यांच्याकडे बघून सामाजिक कार्य करण्यास प्रेरित झालो. ते आमचे मार्गदर्शक, गुरुवर्य, आदरणीय संजय नहार सर, सरहद परिवाराची माय सौ. सुषमा नहार, व सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर सर यांना मनापासून समर्पित करत आहे.
