वाघापूर (अदमापुर) येथे बीजारोपण करून वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करताना संतश्री कृष्णकांत ढोणे, पंडित माने, बजरंग निंबाळकर व मान्यवर
सदगुरू बाळुमामा वृक्षारोपण संकल्प केर्ली द्वारा वृक्षमित्र पंडीत माने यांच्या वतीने व ढोणे महाराज यांच्या शुभहस्ते बीजारोपण करून यावर्षी वृक्षारोपणाचा शुभारंभ करून ही चळवळ मोठी करण्यासाठी म्हणून आशिर्वाद घेण्यात आला.
पर्यावरण चळवळ व्यापक करण्यासाठी वृक्ष लागवड यशस्वी करण्यात मागील 25 वर्षापासुन श्री सदगुरू बाळुमामा वृक्षारोपण संकल्प केर्ली द्वारा वृक्षमित्र पंडीत माने हे यशस्वी झाले आहेत.
आदमापुर वाघापूर मुरगूड सोनाळी व परीसरात मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केल्याबद्दल पर्यावरण प्रेमी, वृक्ष मित्र पंडीत माने यांना
डोणे महाराज यांनी आशिर्वाद दिले.
तसेच वृक्ष मित्र पंडीत माने व नवनाथ माने यांचे कौतुक करून भविष्यात पंडीत माने यांचा सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील पर्यावरण जनजागृती कार्याला आपले संपूर्ण सहकार्य राहील असे अभिवचन देत, या कार्याचा झेंडा भारतचा नकाशावर
येईल व नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल असा आशिर्वाद दिला.
पंडित माने यांनी सांगितले की लग्न विवाह सोहळ्यात, शाळेत तसेच विविध धार्मिक व सामाजिक कार्यामध्ये वृक्ष वाटप तसेच वृक्षबीज वितरण हे कार्यक्रम आवर्जून घेत असून या कार्याला आणि चळवळीला मोठे यश आले असून विविध ठिकाणी वृक्षांचे संगोपन केले जाते. मात्र हा उपक्रम मोठ्या प्रमाणात वाढवायचे असेल तर सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी याला आर्थिक हातभार लावावा असेही आवाहन केले