
कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे आज २१ जून रोजी जागतिक योगदिनानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांचे वतीने सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांचे वतीने क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे करिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी कादबाने यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्व व गरज याबद्दल सांगितले व प्रात्यक्षिके करून मार्गदर्शन केले. तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या अश्विनी दीदी यांनी जीवनातील मनःशांती बाबतचे महत्व पटवून दिले. श्री जीवराज भाई यांनी प्रस्तावना करून ब्रह्म कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय संस्थेचा संक्षिप्त परिचय करून दिला.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय संस्थेचे पदाधिकारी , प्रशासन अधिकारी सुनिल मोरे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम , जालिंदर कदम , अधीक्षक राजकुमार कोंडे , कनिष्ठ अभियंता अशोक पवार, सर्व विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
सहायक आयुक्त श्री लक्ष्मण कादबाने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले….
कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता शिबिराचे आयोजन.
सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या अश्विनी दीदी तसेच जीवराज भाई यांचे मार्गदर्शन
